मुंबईः स्मार्ट फोन क्षेत्रातील कंपनी सॅमसंगच्या नव्या फोल्डेबल स्मार्ट फोनना ग्राहकांचा दमदार प्रतिसाद लाभला असल्याची माहिती आहे. भारतामध्ये या नव्या फोनचे 50 हजार जणांनी आगाऊ बुकींग केले असल्याचे समजते.
16 ऑगस्ट रोजी पहिल्याच दिवशी बारा तासांच्या अवधीमध्ये वरील प्रमाणे मोठय़ा प्रमाणात फोल्डेबल फोनला ग्राहकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. सॅमसंग यावर्षी दीडपट अधिक फोल्डेबल फोन विक्री करण्याच्या दृष्टीने योजना बनवत आहे. मागच्या वेळेच्या तुलनेमध्ये या वेळचे फोल्डेबल स्मार्ट फोन्स हे अधिक सुविधायुक्त असणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. फोल्ड-4 आणि फ्लिप-4 यासाठी सॅमसंगने विक्रीसाठी जाळे विस्तारण्याचे नियोजन कंपनीने केले आहे.
10 हजार शहरात विक्री
सदरचे फोन हे देशातील 10 हजारहून अधिक शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न असणार आहेत. सदरचे फोन हे बोरा पर्पल, ग्रेफाईट आणि पिंक गोल्ड या रंगांमध्ये उपलब्ध होणार आहेत. गॅलेक्सी झेड फ्लिप-4 ची किंमत 89,999 रुपये असणार आहे.









