प्रतिनिधी /बेळगाव
कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशन, बेळगाव संस्थेच्या 2022-24 नूतन कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ सोमवार दि. 30 रोजी होणार आहे. सायंकाळी 7 वा. गांधीनगर येथील हॉटेल संकम येथे हा कार्यक्रम होईल. अध्यक्षपदी संग्राम पाटील तर सेपेटरीपदी आनंद कोहळ्ळी यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला वसंतराव पोतदार पॉलिटेक्निकचे चेअरमन उदय कालकुंद्रीकर उपस्थित राहणार आहेत. मागील कार्यकारिणीचे अध्यक्ष पंचाक्षरी हिरेमठ, सेपेटरी विजय कामकर, इव्हेंट चेअरमन अजय पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. कार्यकारिणीचा अल्पपरिचय पुढीलप्रमाणे-
संग्राम पाटील (अध्यक्ष)
जीआयटीमधून इंजिनियर झालेल्या संग्राम पाटील यांनी मुंबई येथील टाटा कन्सल्टन्सीत नोकरी केली. त्यानंतर बेळगाव येथे स्वतःचा व्यवसाय सुरू केला. शिक्षण संस्था, उद्योग, बँक, रहिवासी व व्यावसायिक इमारती या क्षेत्रात काम सुरू केले. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथे डिझायनिंग व कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांनी आघाडी घेतली.
आनंद कोहळ्ळी (सेपेटरी)
इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आनंद कोहळ्ळी यांनी हौसिंग बोर्ड येथे नोकरी केली. त्यानंतर स्वतःचा आर्किटेक्ट व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियरचा व्यवसाय बेळगावमध्ये सुरू केला. चार वर्षांपासून सिव्हिल इंजिनियर्समध्ये संचालक म्हणून व 2020 पासून जॉईंट सेपेटरी म्हणून सेवा बजावली.









