मुंबई :
रिअल इस्टेट क्षेत्रातील कार्यरत फोनिक्स मिल्स, डीएलएफ, लोढा यांचे समभाग सोमवारी शेअर बाजारात चमकताना दिसले. विविध कंपन्यांचे समभाग 4 टक्केपर्यंत इंट्राडेमध्ये वाढलेले दिसून आले. यामध्ये फोनिक्स मिल्स, लोढा, प्रेस्टीज डेव्हलपर्स यांचा समावेश आहे. रिअल्टी निर्देशांक 2.6 टक्के वाढत 972 च्या स्तरावर दुपारच्या सत्रात कार्यरत होता. लोढाचा समभाग तीन टक्के वाढीसोबत 1231 रुपयांवर पोहोचला होता तर फिनिक्स मिल्सचा समभाग 4 टक्के वाढत 1750 रुपयांवर पोहोचला.









