जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या उपस्थितीत तपासणी : मतदार यादीही निश्चित, तहसीलदारांकडे यादी पाठविणार
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसार लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी आणि विविध पक्षांच्या राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम मतदान यंत्रांची तपासणी करून पहिल्या टप्प्यातील यंत्रे हस्तांतरित करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शुक्रवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी चित्रीकरणाच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीतील विधानसभा मतदारसंघानुसार यंत्राचे वितरण करण्यात आले आहे. अशाप्रकारे मतदान यंत्रांची यादी निश्चित करण्यात आली आहे. सदर मतदार याद्यांची यादी साहाय्यक निवडणूक अधिकारी व तहसीलदारांना पाठविण्यात येणार आहे. यावेळी चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी राहुल शिंदे उपस्थित होते. 5 हजार 874 बीयु, कंट्रोल युनिट वितरण करण्यात आले. ईव्हीएम मतदार यंत्राबरोबर पहिल्या टप्प्यातील चित्रीकरण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पार पडली. बॅलेट युनिट 5 हजार 874, कंट्रोल युनिट 5 हजार 874, व्हीव्हीपॅट 5 हजार 874 यंत्रांचे वितरण करण्यात आले. अशा प्रकारे मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रांचे वितरण करण्यात आले आहे. इतर विधानसभा मतदारसंघातील यंत्रे पुढच्या टप्प्यातील प्रक्रियेत दिली जाणार आहेत.









