हृदयविकाराचा झटका कुठेही आणि केव्हाही येऊ शकतो. बाथरूममध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची अनेक प्रकरणे नोंदवली जातात. आंघोळ किंवा टॉयलेट यांसारख्या अॅक्टीविटीमुळे हृदयाला चालना देऊन कार्डियाक अरेस्ट येऊ शकतो असे कारण समोर आले आहे. तुमची लाईफस्टाईल कशी आहे यावर हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण ठरले जाते. आता एक संशोधन समोर आले आहे की, तुम्ही किती वेळा फ्रेश व्हायला जाता, त्यावरून तुमचा हार्ट फेल होण्याचा धोका दिसून येतो. पुन्हा पुन्हा टॉयलेटला जाण्याने हार्ट अटॅक येतो का हे आपण जाणून घेणार आहोत.
रिसर्च काय सांगतो
एका संशोधनात ३० ते ७९ वर्षे वयोगटातील लोकांची निवड करण्यात आली. यामध्ये ३० वयोगटातील ४८७ तर ७९ वर्षे वयोगटातील १९८ लोकांनी भाग घेतला. चायना कडूरी बायोबँक कडून हा डेटा घेण्यात आला. अभ्यासाच्या सुरुवातीला सहभागींना कर्करोग, हृदयविकार किंवा पक्षाघात यांसारखी कोणतीही समस्या नव्हती. त्यांचा १० वर्षे पाठपुरावा करण्यात आला. संशोधनात असे समोर आले आहे की जे लोक दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा पोट साफ करण्यासाठी जातात त्यांना इस्केमिक हृदयरोगाचा धोका जास्त असतो. इस्केमिक हृदयरोगाला कोरोनरी हृदयरोग देखील म्हणतात. यामध्ये हृदयविकाराचा धोका जादा असतो.
कमी वेळा शौचाश जाणे देखील हाणीकारक
अभ्यासात असेही समोर आले आहे की, ज्याप्रमाणे जास्त वेळा शौचालयात जाण्याने समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे कमी वेळा शौचालयात जाणे देखील चांगले नाही. बद्धकोष्ठतेची तक्रार असणाऱ्यांना हृदय, किडनीचे आजार आणि पक्षाघाताचा धोकाही असतो, असे संशोधनातून समोर आले आहे. अभ्यासात असे आढळून आले की, तुम्ही शौचाला जाण्याची वारंवारता तुम्हाला भविष्यात हृदयविकाराचा झटका येण्याशी संबंधित आहे. या अभ्यासापूर्वीही हृदयरोगींना बद्धकोष्ठतेची समस्या असल्याचे दिसून आले आहे.आंघोळीमुळेही तणाव निर्माण होतो.
अनेकांना पुन्हा पुन्हा शौचालयास जाण्याची सवय असते. ते याकडे लक्ष देत नाहीत पण त्यामुळे तुमच्या हृदयावर ताण येतो. तुमचे हृदय आधीच कमकुवत असेल तर अशावेळी अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. खूप थंड किंवा खूप गरम पाण्याने अंघोळ केल्यानेही हृदयाला धोका निर्माण होतो. आंघोळ करताना तुमचे शरीर ताबडतोब तापमान राखण्यास सुरवात करते. यामुळे तुमच्या धमन्या आणि नसांवर ताण येतो.
पचनसंस्थेची काळजी घ्या
हृदयविकाराच्या कोणत्याही लक्षणांना हलके घेऊ नका. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना बद्धकोष्ठता आहे किंवा पुन्हा पुन्हा फ्रेश होण्यासाठी जावे लागत असेल तर तुम्ही तुमची जीवनशैली बदलली पाहिजे. पाणी पिणे, चालणे आणि फायबर युक्त अन्न घेणे असे अनेक मार्ग आहेत, जे तुमच्या समस्येवर मात करू शकतात.
Previous Articleकाकड आरतीला महिलांची लक्षणीय उपस्थिती
Next Article राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याकरिता नोंदवा तुमचे मत!









