महाराष्ट्रातील न्यायालयात सरकारकडून पीएफआयचा पर्दाफाश
नाशिक / वृत्तसंस्था
बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर प्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेने अयोध्येतील रामजन्मभूमीवरचे राम मंदीर पाडून त्यास्थानी मशीद बांधण्याचा कट रचला होता, असा गौप्यस्फोट महाराष्ट्रातील नाशिक येथील सत्रन्यायालयात सरकारी वकीलांनी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून लोकांमध्ये संतापाची भावना आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तपासात या कटाची कबुली दिली, असे प्रतिपादन करण्यात आले.
नाशिकमध्ये अनेक पीएफआय हस्तकांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा कसून तपास करत असताना त्यांनीच पोलिसांना या कटाची माहिती दिली. अयोध्येत सध्या रामजन्मभूमीवर भव्य राम मंदीराचे निर्माण कार्य होत आहे. हे मंदीर पीएफआयच्या डोळय़ात खुपत असून ते पाडविण्याचा कट रचण्यात आला होता. या कटाला साहाय्य करण्यासाठी इतर मुस्लीमबहुल देशांमधील कट्टर इस्लामी संघटनांना आवाहन करण्यात आले होते. भारतातील पीएफआयचे कार्यकर्ते इतर मुस्लीम देशांमधील इस्लामी संघटनांशी या संदर्भात संपर्कात होते. यावरुन हा कट किती खोलवरचा होता हे दिसून येते, असे प्रतिपादन सरकारी वकीलांनी केले.
अनेक हस्तकांना अटक
सप्टेंबर महिन्यात पीएफआयवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर देशभरात या संघटनेच्या अनेक हस्तकांना आणि समर्थकांना अटक करण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील अनेक शहरांचा समावेश होता. औरंगाबाद, नाशिक आदी शहरांमधून अनेक हस्तकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्याच तोंडून या संघटनेची अनेक कारस्थाने बाहेर पडत आहेत. ही परिस्थिती गंभीर आहे, असे सरकारच्या वतीने न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.
महाराष्ट्रात पाळेमुळे खोलवर
या संघटनेने गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रात आपली पाळेमुळे घट्ट रोवल्याचे दिसून येत आहे. या राज्याच्या बहुतेक मोठय़ा शहरांमध्ये पीएफआयचे क्रियाशील किंवा गुप्त असे गट आहेत. मुस्लीम तरुणांना धर्माच्या नावावर भडकाविण्याचे कार्य हे गट करत असतात, असेही पोलिसांना आढळल्याचे प्रतिपादन पेले गेले.
देशाच्या इस्लामीकरणाचे कारस्थान
केवळ राम मंदीर पाडविण्याचेच नव्हे, तर संपूर्ण भारत देशाचेच इस्लामीकरण करण्याचे कारस्थान पीएफआय या संघटनेने रचले असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली आहे. भारताच्या इस्लामीकरणाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये एकाच वेळी कार्यरत होऊ शकतील अशी मोडय़ूल्स बनविण्यात आलेली आहेत. या संदर्भातील भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. हा घातक कट आहे, असे वकीलांनी न्यायालयासमोर प्रतिपादन केले.
पाच हस्तकांना विदेशात प्रशिक्षण
पीएफआयचे पाच हस्तक विदेशात जाऊन दहशतवादाचे प्रशिक्षण घेऊन आले आहेत. त्यांच्या खात्यांवर विदेशांमधून बरीच मोठी रक्कम जमा झालेली दिसून येत आहे. या रकमेचा उपयोग दहशतवादी कृत्यांसाठी करण्यात येणार होता, असे पुरावे पोलासांना मिळाले आहेत. या दहशतवाद्यांनी एक व्हॉटस्ऍप गट बनविला असून या गटाचा ऍडमिन पाकिस्तानातील आहे. या साऱया कटांना इतर मुस्लीम राष्ट्रांचा पाठिंबा असल्याची अशीही माहिती न्यायालयात देण्यात आली.
पीएफआयची अतिघातक कारस्थाने
- भारताचे इस्लामीकरण येत्या 25 वर्षांमध्ये करण्याचे कारस्थान
- भारतात दहशतवादी हल्ले करुन हिंदूंना घाबरविण्याचे शड्यंत्र









