आयएसआयकडून मंदिरांना लक्ष्य करण्याचे ‘नापाक’ षड्यंत्र
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने प्रजासत्ताक दिनानिमित्त पंजाब आणि इतर राज्यांमध्ये दहशत माजवण्याचा नापाक कट रचला आहे. दहशतवादी कारवायांसाठी आयएसआयने पॅनडामध्ये बसलेल्या लखबीर सिंग आणि पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हरविंदर सिंग रिंडा या दहशतवाद्यांना नवीन लक्ष्य दिले आहे. भारतात पुढील काही दिवसात होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि त्यानंतरच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान आयएसआय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना प्राप्त झाली आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील भगवान श्रीराम यांच्या जन्मस्थानी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान आयएसआय आपल्या हस्तकांकरवी मंदिरांना लक्ष्य करू शकते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. या दिवशी मंदिरांमध्ये मोठ्या संख्येने भाविक जमा होणार आहेत. त्यांना लक्ष्य बनविण्याचे कारस्थान दहशतवादी संघटनांकडून सुरू आहे. तसेच पंजाबच्या तुऊंगात हल्ले करण्याचा कटही रचण्यात आला आहे. मात्र, गुप्तचर यंत्रणांनी माहिती मिळताच पंजाबसह इतर राज्य सरकारांना सतर्क केले आहे. गेल्या काही दिवसांपासूनच केंद्रीय गृह मंत्रालयाने सतर्कतेची पावले उचलत दहशतवादी संघटना आणि काही मास्टरमाइंडवर कारवाई किंवा बंदी घालण्याचे सत्र सुरू केले आहे. आता आणखी एका कारवाईत केंद्र सरकारने हरिके पट्टण शहरातील लखबीर सिंग याला दहशतवादी घोषित केले आहे.
गुन्हेगारी कटात नव्या चेहऱ्यांचा समावेश
धार्मिक आणि राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याव्यतिरिक्त लखबीर सिंग आणि रिंडा हे सार्वजनिक ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यासाठी एक नवीन मॉड्यूल तयार करत आहेत. या नवीन मॉड्यूलमध्ये यापूर्वी कोणत्याही गुन्हेगारी घटनेत सहभाग नसलेल्या तऊणांचा समाविष्ट करण्यात आल्याचे समजते. एवढेच नाही तर भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील गावांमध्ये पाकिस्तानचे जाळे विस्तारले जात आहे.









