नेव्हील अल्फोन्सो यांचे आवाहन, करंजाळे येथे नारळ दिन साजरा
पणजी : शेतकरी, सरकारी मदत आणि ग्राहक हे सध्याच्या आणि भावी पिढीसाठी नारळाचे क्षेत्र टिकवून ठेवण्यासाठी तीन महत्त्वाचे घटक आहेत, अशी माहिती कृषी संचालनालयाचे संचालक नेव्हिल अल्फोन्सो यांनी दिली. कृषी संचालनालयाने राज्य कृषी व्यवस्थापन आणि विस्तार प्रशिक्षण गोवा आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी उत्तर गोवा यांच्या सहकार्याने कृषी भवन टेंक करंजाळे येथे आयोजित केलेल्या जागतिक नारळ दिनाच्या समारंभात ते बोलत होते. 2023 ची यावर्षाची संकल्पना होती सध्याच्या आणि भावी पिढीसाठी नारळ क्षेत्र टिकवून ठेवणे अशी आहे. भावी पिढीसाठी नारळाचे क्षेत्र टिकवून ठेवण्याच्या तीन महत्त्वाच्या घटकांबद्दल माहिती देताना श्री आल्फ?न्स? यांनी शेतकऱ्यांनी नारळाच्या उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. सरकारच्या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत होऊ शकते आणि प्रत्येक ग्राहक आणि नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात नारळ वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून नारळाचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जाईल असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना अल्फान्सो यांनी गोव्यातील लोक मुख्यत: नारळाचा वापर स्वयंपाक करण्यासाठी, खोबरेल तेल बनविण्यासाठी आणि सुवासिक नारळ बनविण्यासाठी करतात. नारळाच्या कवचाचा वापर करून बनविता येणाऱ्या हस्तकला उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आज हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे असे ते म्हणाले. शेतकरी नारळाच्या कवचाची विक्री करून उत्पन्नही मिळवू शकतात ज्यामुळे गोव्यात नारळाच्या शेल उद्योग वाढण्यास मदत होईल.नारळ हे गोव्यातील पारंपारिक लागवडीचे पीक आहे आणि त्याला ठकल्पवृक्षठ म्हणूनही संबोधतात आणि नारळाला गोव्यातील लोकांच्या जीवनात एक अत्यावश्यक स्थान आहे असेही ते म्हणाले.
बेंगळुरू येथील नारळ विकास मंडळाचे तांत्रिक अधिकारी श्री शरथकुमार जी यांनी मेळाव्याला संबोधित करताना दरवषी 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिवस म्हणून साजरा केला जातो असे सांगितले. नारळाचे महत्त्व सांगताना श्री शरथकुमार यांनी ते पर्यावरणीय देखभालीसाठी योग्य असून इतर वनस्पतींच्या तुलनेत जैवविविधता टिकवून ठेवू शकते असे सांगितले. जागतिक नारळ दिनानिमित्त नारळावर टेक्नकिल बुलेटिनचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी किशोर भावे, विनोद अतकरी, शरथकुमार जी यांची विविध तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था (Aऊश्A) उत्तर-गोवा यांनी राजभवन, गोवा आणि कृषी संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जॅकफ्रूट महोत्सवात सहभागी झाल्याबद्दल श्रीमती प्रतमा राणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच नारळ पाककला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे वितरित करण्यात आली. यावेळी गोवा स्टेट हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री चंद्रास नाईक देसाई आणि उपसंचालक श्री अनंत होबळे उपस्थित होते. सहाय्यक कृषी अधिकारी पल्लवी शेट्यो यांनी सूत्रसंचालन केले. कृषी उपसंचालक (उत्पादन) संदीप फळदेसाई यांनी स्वागत केले, एटीएमएचे उप प्रकल्प संचालक श्रीकांत मुळे यांनी आभार मानले.









