नॅशनल पीपल्स पार्टीचे प्रमुख कोनराड संगमा यांनी मंगळवारी शिलाँगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सलग दुसऱ्यांदा मेघालयचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आपल्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह अन्य 11 जणांनी मंत्र्यांनी शपथ घेतली. मेघालयाचे राज्यपाल फागु चौहान यांनी 12 सदस्यीय मंत्रिमंडळाला शपथ दिली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित यांनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.एनपीपीचे प्रेस्टोन टायन्सॉंग आणि भाजपचे अलेक्झांडर लालू हेक यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) च्या एकूण 8 आमदारांनी, यूडीपीच्या 2 आणि भाजप आणि एचएसपीडीपीच्या प्रत्येकी 1 आमदारांना संगमा यांच्या मंत्रिमंडळात राजभवनात मंत्री म्हणून गोपनीयतेची शपथ देण्यात आली. कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार्या NPP मधील मार्कुइस एन मारक, रक्कम ए संगमा, अँपरीन लिंगडोह, कमिंगोन यम्बोन आणि एटी मंडल यांचा समावेश आहे. भाजपचे एएल हेक, यूडीपीचे पॉल लिंगडोह आणि किरमन शिल्ला आणि एचएसपीडीपीचे शकलियार वर्जरी यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उभारीस आलेल्या कॉनऱॅड संगमा यांच्या एनपीपी या पक्षाने 60 सदस्यीय मेघालय विधानसभेत 26 जागांवर विजय मिळवला. बहूमतासाठी 31 हा जादूई आकडा गाठण्यासाठी त्यांना अजून 5 जागांची गरज होती. अशा वेळी इतर दोन स्थानिक पक्षांच्या आणि भाजपच्या पाठिंब्यांने संगमा यांच्या एनपीपीने मेघालयात सत्ता स्थापन केली. 3 मार्चरोजी डॉ. संगमा यांनी राज्यपाल फागू चौहान यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा पाठवला होता. त्यानंतरल त्यांनी लगेच नवीन सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला होता.








