कर्नाटकात 30 सप्टेंबरला दाखल होणार
तिरुअनंतपुरम / वृत्तसंस्था
काँग्रेसची भारत जोडो यात्रा तामिळनाडूमार्गे केरळमध्ये पोहोचली आहे. रविवारी केरळमधील परसाला परिसरात यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यासोबतच 19 दिवसांच्या केरळ यात्रेलाही सुरुवात झाली. ही यात्रा पुढील 19 दिवस केरळमध्ये अनेक भागात फिरून 30 सप्टेंबरला कर्नाटकात दाखल होणार आहे.
‘भारत जोडो’ यात्रेचे नेतृत्त्व करणाऱया राहुल गांधी यांचे केरळ प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आणि खासदार के सुधाकरन, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन आणि एआयसीसीचे सरचिटणीस तारिक अन्वर आणि इतर नेत्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत के. सी. वेणुगोपाल, शशी थरूर, केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
केरळमध्ये 19 दिवसात 450 किमीचा प्रवास
केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी 19 दिवसांच्या कालावधीत 450 किमीचा प्रवास करून मलप्पुरममधील निलांबूरपर्यंत जातील. ही यात्रा 14 सप्टेंबर रोजी कोल्लम जिह्यात दाखल होणार आहे. त्यानंतर 17 सप्टेंबरला अलाप्पुझा येथे पोहोचेल आणि 21-22 सप्टेंबरला एर्नाकुलम जिह्यातून 23 सप्टेंबरला थ्रिसूरला पोहोचेल. 19 सप्टेंबर रोजी प्रियांका गांधीही भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्मयता आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये कन्याकुमारी ते काश्मीर या प्रवासात 3 हजार 570 किमीचे अंतर कापले जाणार आहे.









