विश्वनाथ मोरे
कसबा बीड /प्रतिनिधी
संपूर्ण भारतभर काँग्रेस पक्ष वाढीसाठी विविध स्तरावर प्रयत्न होत आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात , तालुक्यात व राज्यात जाऊन कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद , तसेच स्थानिक सर्व संस्था व 2024 ला होणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मोठे करणे व बळ देणे गरजेचे आहे, ही सद्यस्थिती असताना कुंभी कासारी साखर कारखाना निवडणूक यासाठी अपवादात्मक झाली असे म्हटले तर वावगे होणार नाही.
कुंभी कासारी साखर कारखाना या निवडणुकीमध्ये काँग्रेस गट विरुद्ध व शिवसेना गट अशी थेट लढत होत असते. गेल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या वतीने सरकार अस्तित्वात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, या कार्यकर्त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. पण गेल्या काही महिन्यात हे चित्र बदलल्यामुळे शिवसेनामध्ये दोन गट निर्माण झाले ही संभ्रमावस्था शिवसेनेमध्ये सध्या दिसून येत होती.
काँग्रेस पक्ष वाढीसाठी ही खरोखरच जीवनदायिनी वेळ होती असे म्हटले तर वावगे होणार नाही. अशावेळी स्थानिक संस्था या ठिकाणी काँग्रेस पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांना बळ देणे ही काँग्रेसच्या नेत्यांची नैतिक जबाबदारी आहे, असे न होता कार्यकर्त्यांचा बळीच बळी द्यायचा असेच चित्र सध्या करवीर विधानसभा मतदारसंघात दिसत आहे. कुंभी कासारी साखर कारखाना या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या मध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता. अतिशय चांगल्या पद्धतीची मोट बांधून शिवसेना पक्षाचे चंद्रदीप नरके यांना कडवा विरोध होता, पण ऐनवेळी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी पाठिंबा दिल्यामुळे झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत विरोधकांना फायदा झाला. तरीसुद्धा काँग्रेसच्या काही लढवय्या उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस जिवंत आहे, कॉंग्रेसची नाळ प्रत्येक नागरिकांपर्यंत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला .
फक्त दोन राजकीय नेत्यांच्या श्रेयवादामुळे दुसऱ्या पक्षाचा विजय झाला हे चित्र स्पष्ट दिसत होते ही सद्य वस्तुस्थिती आहे. यावर ज्यांनी विरोधकांना मदत केली तेथे विरोधक विजयी झाले. तर ज्यांनी कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे म्हणून मदत केली त्यांनी एकनिष्ठेने पाठिशी उभे राहिले. कार्यकर्ता मोठा झाला तर नेता मोठा होतो व नेता मोठा झाला तर राज्य मोठे होते व राज्य मोठे झाले तर देशात पक्षाची सत्ता निर्माण होते यासाठी एकनिष्ठ प्रयत्न केले. पण या सर्व परिस्थितीमध्ये कुंभी कासारी साखर कारखाना निवडणुकीमध्येकाँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा बळी गेला हे कटू सत्य आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









