सांगरूळ व पासार्डे येथे सत्तांतर
सांगरूळ / वार्ताहर
सांगरूळ परिसरातील सांगरूळ, पासार्डे व बोलोली ग्रामपंचायत पैकी सांगरूळ व पासार्डे येथे काँग्रेसची सत्ता तर बोलोली येथे शिवसेना काँग्रेस सह सर्वपक्षीय आघाडीची सत्ता आली आहे.
सांगरूळ येथे गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, आमदार प्रा. जयंत आसगावकर, बाजीराव खाडे व शिवाजीराव खाडे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीने लोकनियुक्त सरपंच पदासह १७ पैकी १४ जागा जिंकून सत्तांतर केले आहे. कुंभीचे व्हा. चेअरमन निवास वातकर बाजीनाथ खाडे, दिलीप खाडे व सदाशिव खाडे यांच्या सांगरूळ ग्रामविकास आघाडीला तीन जागांवर समाधान मानावे लागले.
सरपंच पदासाठी झालेल्या दुरंगी लढतीत काँग्रेसच्या शितल बदाम खाडे या विजयी झाल्या आहेत. या गटाचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
रेषा संभाजी आंबी (बिनविरोध ) विद्या सचिन चाबूक, गजानन गोरखनाथ शिवदे, सचिन रामचंद्र नाळे, साक्षी दीपक म्हेतर, उज्वला सचिन लोंढे, रवींद्र विष्णू खाडे, जालिंदर केरबा कांबळे, मधुरा सागर खाडे, बाळासो वासुदेव खाडे, गीतांजली मुरलीधर कासोटे.
विरोधी सांगरुळ ग्राम विकास आघाडीचे विजयी उमेदवार शुभम राजाराम खाडे, पै. सुशांत ज्ञानदेव नाळे, मेघा बदाम सातपुते.
पासार्डेमध्ये विष्णू पाटील, संभाजी चाबुक, के.के. चौगले यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस प्रणित श्री शंभू महादेव भेंडाई ग्रामविकास आघाडीने सरपंच पदासह नऊ पैकी पाच जागा जिंकत सत्तांतर केले आहे. विरोधी तुकाराम पाटील, बाजीराव चौगले, सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिवसेना प्रणित श्री महालक्ष्मी भेंडाई ग्रामविकास आघाडीला चार जागा मिळाल्या आहेत. सरपंच पदासाठी झालेल्या दुरंगी लढतीत काँग्रेसचे विष्णू पाटील हे विजयी झाले आहेत. या गटाचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे शरद शामराव पाचाकटे, सविता रमेश कांबळे, इंदुबाई बाळू सुतार, महेश एकनाथ पाटील, रंगराव लक्ष्मण सुतार
विरोधी विजयी आघाडीचे उमेदवार पुढील प्रमाणे कोमल सचिन चौगले, वैष्णवी विलास चौगले,राणी रंजीत भोसले , भिवाजी शंकर खामकर.
बोलोलीमध्ये झालेल्या चुरशीच्या दुरंगी लढतीमध्ये शिवसेना काँग्रेस सर्वपक्षीय स्थानिक आघाडीच्या श्री स्वयंभू ग्रामविकास पॅनेलने लोकनियुक्त सरपंच पदासह आकरा पैकी आठ जागा जिंकत सत्ता अबाधित ठेवली आहे. विरोधी श्री स्वयंभूराज ग्रामविकास सर्वपक्षीय स्थानिक आघाडीला तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. सरपंच पदासाठी झालेल्या पंचरंगी लढतीमध्ये सत्ताधारी गटाच्या पौर्णिमा सरदार कांबळे विजयी झाल्या आहेत. या गटाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे संतराम सदाशिव राणे, संभाजी लहू बाटे, कविता उत्तम पाटील, वर्षा विश्वजित सुतार, गीता आगंद दुर्गुळे, दिलीप कृष्णात पाटील, धोंडीराम रामा बाटे शारदा अनिल बाटे.
विरोधी सर्वपक्षीय स्थानिक आघाडीचे विजय उमेदवार पुढील प्रमाणे शिवाजी बापू बाटे, रसिका दत्तात्रय बाटे, शोभा महादेव सातपुते.
विजय उमेदवाराच्या समर्थकांनी विजयी मिरवणुका काढत विजयोत्सव साजरा केला .









