ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे-फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वीच औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यास मंजुरी दिली. या नामांतरावेळी काँग्रेसने नेहमीच दुटप्पीपणाची भूमिका घेतली होती. नामांतरास काँग्रेसचा छुपा विरोध होता, असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर यांनी केला आहे.
भोर म्हणाले, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होत आहे. या शहराच्या नामांतराबाबतच्या दुटप्पी धोरणाचा लोकांच्या मनातील संभ्रम काँग्रेसच्या नेत्यांनी सभेत दूर करावा. आतून एक आणि वरुन एक अशी काँग्रेसची भूमिका असते. त्यामुळे औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे जाहीरपणे समर्थन करण्याची हिंमत काँग्रेस नेत्यांनी दाखवावी, असे आव्हानही भोर यांनी दिले.
अधिक वाचा : मुश्रीफ यांच्यावर आणखी 67 शेतकऱ्यांकडून फसवणुकीची तक्रार दाखल








