राज्यात बदलत्या राजकिय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर कॉंग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी राजकिय हालचाली सुरु केल्या असून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरु केली आहेत. कॉग्रेसचे केंद्रिय महासचिव केसी वेणुगोपाल यांनी प्रकाश आंबेडकरांबरोबर ही चर्चा फोनवरून केली असल्याचे सुत्रांकडून कळत आहे.
अजित पवार राष्ट्रवादीचे काही आमदार घेऊन शिंदे- फडणवीस सरकार मध्ये सामिल झाल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष सावध झाले असून कॉग्रेसनेही केंद्रिय स्तरावर नविन आघाडी करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
कॉग्रेसच्या केंद्रीय नेर्तृत्वाने बदल्यात राजकिय घडामोडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला साद घातल्याची माहीती समोर येत असून कॉंग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांशी फोनवरून चर्चा केली आहे. ही चर्चा तब्बल 13 मिनीटे चालली असून प्राथमिक स्तरावर चर्चा घडून आली आहे. प्रत्यक्ष युतीबाबतची चर्चा राहूल गांधी यांच्याबरोबरच करण्य़ासाठी वंचितचे नेते आग्रही असल्याची बातमी आहे.
राष्ट्रवादीच्या बंडाळीनंतर कॉंग्रसने लगेच चाचपणी सुरु केली असून प्रकाश आंबेडकर काही वेगळा विचार करत आहेत का हे पहात आहेत. कॉग्रेस प्रकाश आंबेडकरांना घेऊन नविन आघाडीची स्थापना करण्याची शक्य़ता असून यात शिवसेनेची भुमिका काय याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
यापुर्वीही प्रकाश आंबेडकरांनी 1998- 99 मध्ये कॉंग्रेसबरोबर आघाडी केली होती. प्रकाश आंबेडकर आपल्या काही आमदारांसह कॉंग्रेसच्या मदतीने विधानसभेवर निवडूनही गेले होते. ‘वंचित’ कॉगेरसबरोबर आघाडीचा फायदा होणार असल्याची कार्यकर्त्यांकडून मागणी होत असल्याची सुत्राकडून माहीती आहे.








