Rahul Gandhi : काँग्रेसनं काल एक टि्वट केले आहे त्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतेय. या टि्वटमध्ये “सावरकर समझा क्या? नाम राहुल गांधी है”,अशा आशयाचे कॅप्शन टाकलं असून काँग्रेस खासदार राहुल गांधी याचा कारमध्ये बसलेला फोटो देखील शेअर केला आहे. यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्य़ात सापडले आहेत. दरम्यान केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी सावरकरांसारख्या मोठ्या व्यक्तीमत्वाचा अपमान न करण्याचा काँग्रेसला सल्ला दिला आहे.
मंत्री किरेन रिजिजू यांनी सोबतच एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आवाज आहे. सावरकर कोण होते, याविषयी वाजपेयी यांनी सांगितले आहे.एखाद्या माणसाच्या चारित्र्याची महानता त्याच व्यक्तीला समजेल ज्याला त्यागाची भावना समजते असेही किरेन रिजिजू यांनी म्हटलयं. तर काँग्रेसच्या त्या टि्वटचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. मी तुम्हाला हाथ जोडून विनंती करतो,वीर सावरकरासारख्या महान व्यक्तीमत्वाचा अपमान करु नका,असे रिजिजू यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विधानामुळे वादात सापडत आहेत. राहुल गांधींनी लंडन दौऱ्यादरम्यान केलेल्या विधानांवर भाजपाकडून परखड शब्दांत टीका करतानाच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.दरम्यान पुन्हा काँग्रेसने सावरकरांचे नाव घेऊन ट्विट केल्याने राहुल गांधी पुन्हा भाजपच्या निशाण्यावर आले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









