पलूस :
राज्यातील वाढती बेरोजगारी, महागाई, गुन्हेगारी, दलित अन्याय अत्याचार, शेतकरी, विद्यार्थी, युवकांच्या विविध प्रश्नावर युवक काँग्रेसकडून आज आक्रोश पदयात्रा काढण्यात येत आहे. पुणे येथील लालमहालपासून मुंबई येथील विधान भवन याठिकाणी घेराव करण्यात येणार आहे. पदयात्रेत सांगली जिह्यातून शेकडो युवक माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचे मार्गर्शनाखाली पदयात्रेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुशील गोतपागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बेरोजगारी, महागाई, गुन्हेगारी, दलित अन्याय अत्याचार, शेतकरी, विद्यार्थी यांच्या प्रश्नांसाठी पुणे ते मुंबई, विधानभवन आक्रोश पदयात्रा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने शनिवार दि 15 मार्च रोजी काढण्यात येणार आहे. या पदयात्रेला पुण्यातून माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात होणार असून राज्यातून हजारो युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते या पदयात्रेला येणार आहेत.
दिल्लीमधून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब, प्रभारी अजय चिकराजी, अहसन खान, कुमार रोहित उपस्थित राहणार आहेत. 15 पासून 19 मार्चपर्यंत पदयात्रा होणार आहे. जिह्यातून आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ताकदीने पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
यावेळी प्रदेश महासचिव सुधीर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुजित लकडे, सरचिटणीस नखील सुतार, सुशांत साळुंखे, पलूस कडेगांव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, खानापूर आटपाडी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित पाटील, तासगाव कवठेमहांकाळचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल शिंदे, जत विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश बनसोडे, पलूस शहर युवचे अध्यक्ष रोहित दळवी, काँग्रेस सेवादल चेअध्यक्ष सुशांत जाधव, सूरज मिसाळ, शंकर सदामते यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








