वृत्तसंस्था/ शिमला
काँग्रेस नेते राहुल गांधी हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाच्या नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड करतील. प्रदेशाध्यक्षांसोबतच मंत्रिमंडळाचा विस्तारही राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय पातळीवर सुरू आहे. राहुल गांधी यांनी प्रदेश काँग्रेसमधील गटबाजी आणि काँग्रेस हायकमांडच्या अपयशाची दखल घेतली आहे. हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये कार्यकारिणी स्थापनेची प्रक्रिया वेगवान झाली आहे. एकीकडे, प्रदेश काँग्रेस समितीमध्ये प्रादेशिक आणि जातीय संतुलन दिसून येईल आणि दुसरीकडे युवा आणि ज्येष्ठ नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देखील सोपवल्या जातील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांशी बोलणी सुरू केली आहेत. युवक काँग्रेसच्या मागील कार्यकारिणी समितीमध्ये महत्त्वाची पदे भूषवणाऱ्या नेत्यांना प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे पद मिळू शकते.









