वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आपल्याला चार मुले असून इतक्या संख्येने मुले होण्यासाठी काँग्रेस सरकार जबाबदार आहे, असा अनोखा दावा भाजपचे खासदार रविकिशन यांनी केला आहे. त्यांनी लोकसभेत लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडताना हा दावा केला. लोकसंख्या नियंत्रण कायदा अगोदरच करण्यात आला असता तर देशाची लोकसंख्या मर्यादित राहून देशाचा लाभ झाला असता, असे प्रतिपादन त्यांनी केले. रविकिशन हे भाजपचे गोरखपूर येथील खासदार आहेत. लोकसंख्या नियंत्रण कायदा सर्व धर्मांच्या समाज घटकांवर लागू करण्यात यावा, अशी मागणी अनेकांनी केली असून लोकसंख्या वाढ नियंत्रणात न आणल्यास देशातील सामाजिक समतोलही बिघडू शकतो, असा इशारा अनेक तज्ञांनी दिला आहे.









