सांगली / विनायक जाधव :
आगामी महापालिकेच्या आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे. पुन्हा एकदा माजी राज्यमंत्री आ. डॉ. विश्वजीत कवम आणि खा. विशाल पाटील यांनी एकीची मुठ बांधली आहे. त्यांनी सांगली जिल्हयातील सर्व काँग्रेसजनांना हाक घातली आहे. काही विवसांपुर्वी कोणत्याही मिडिया तसेच काँग्रेसमधील काही लोकांना या बैठकीची माहिती न देता ही गुपचुप मिटिंग झाली आहे. यामध्ये अनेकांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हयातील नेत्यांच्यावरच तोफ डागली असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता मनाने खचलेलला आहे. पण त्याने कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाही असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांना पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत… हेही नसे थोडके.
आगामी काळातील या निवडणुका सामान्य नागरिकांसाठी आणि सामान्य कार्यकत्र्यासाठी अत्यंत महत्वाच्य ठरणार आहेत. कारण सतेची फळे सामान्य कार्यकत्यांना या निवडणुकीतून मिळणार आहेत. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका म्हणजे नेत्यांपेक्षा कार्यकत्यांना बळ देणाऱ्या ठरणार आहेत, त्यामुळे आत्तापासूनच कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

त्यांना या नेत्यांनी योग्य ती साथ दिली तर हे कार्यकर्ते काँग्रेस पश्नाचा झेंडा सहजपणे विजयापर्यंत पोहोचवू शकतात. भाजपाचा कट्टर विरोधक म्हणून काँग्रेस पक्षाकडे पाहिले जाते. काँग्रेस पक्षाचा एक विशिष्ठ मतदार आहे तो त्याच्यापासून कोणत्याही परिस्थितीत बाजूला जात नाही.
अशा मतदारांना हाक घालत त्यांच्याबरोबरीने हे कार्यकर्ते जर कामाला लागले तर महापालिकेत आणि जिल्हा परिषदमध्ये निश्चितपणे चमत्कार घडू शकती है काँग्रेरा कार्यकर्ते नव्हे तर सामान्य नागरिकड़ी बोलतात. पण हीच गोष्ट कग्रिराच्या नेत्यांना माहिती नाही याचे मात्र आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
- सामान्य कार्यकर्तेच काँग्रेसला देणार बळ हेही तितकेच खरे…
जिल्हा कॉग्रेसला एकत्रित आणणारे नेते आणि सामान्य कार्यकत्याला सरीविरूध्य लक्षण्याचा नारा येणारे नेतृत्व जर निर्माण झाले तर या जिल्हयात काँग्रेसला यतापासून कोणीही रोखू शकत नाही. पण हे करणार कोण हाच खरा सवाल आहे.
या सामान्य कार्यकत्यांची अपेक्षा काही आहे त्यांना काय दिले म्हणजे आणखीन चैतन्याने कामाला लागतील हे मुळी जिल्हयातील पश्वक्षेष्टीना समजून येत नाही असा अनेक सामान्य कार्यकत्यांचा सूर आहे. यावे मुख्य कारण म्हणजे जिल्यातील काँग्रेस इतक्या पराभवाच्या छत्येत गेली असतानाही अद्यापही गटा-तटातच अडकून पडली आहे.
माजी मंत्री आ.विश्वजीत कदम यांनी जिल्यातील कोंग्रेसला एकत्रित करण्याची किमया तीन वर्षापुर्वी अत्यंत चांगल्या पध्दतीने केली होती. त्यांनी यामध्ये सर्व कंडिग्रेसची एकझकारे चांगली बांधणी केली होती. पण लोकसमा निवडणुका आणि विधानरामा निवडणुका झाल्या आणि ही यांचणी पुन्हा एकदा विरकटली आहे. यामुळे सामान्य कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.
एकटे विश्वजीत कदम ज्यावेळी ही एकत्रिकरणादी प्रक्रिया पार पाडत होते. त्यावेळी इतर नेत्यांनी फक्त आणि फक्त स्वतःবা লাস बघितला त्यांनी या एकत्रिकरणाच्या प्रक्रियेत मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला नाही हेही तितकेच खरे आहे. लोकसभा निवडणुकीवेळी विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीपासून विल्लीपर्यंत घड़क मारुन दिलतीलाही सांगलीची हथा दाखवून दिली होती. पण पुढे काय झाले….हा इतिहास सर्वांना माहित आहे. त्यामुळे सांगली जिल्हयातील कॉंग्रेसचे नेते कधी एकचित होणार की नाही असा विरोधकांना नव्हे तर त्यांचे काम करणान्या सामान्य कार्यकत्यांनाही प्रश्न पडला आहे. पण हाच सामान्य कार्यकर्ता काँग्रेसला यशाच्या शिखरावर नेणार हे निश्चित आहे.
- मदनभाऊ गट पूर्ण बाहेर पडला त्यामुळे गटबाजी थांबली पाहिजे
मदनभाऊ गटाने अनेक नेते आणि पत्राधिकारी हे श्रीमती जयश्रीवहिनीच्या बरोबरीने भाजपामध्ये गेले आहेत. त्यामुळे कांग्रेसमध्ये भक्कम साचा असणारा काँग्रेसचा एक गट पूर्णपणे बाहेर पडला आहे. यामुळे आता महापालिका क्षेत्रात काँग्रेसमध्ये गटबाजी असणार नाही. पण तरीही गटयाजीचे राजकारण हेच खरे राजकारण असे काँग्रेसच्या कार्यकत्यांच्या रक्तात भिनले आहे. त्यामुळे ही गटबाजी भांगवण्यासाठी आता नेत्यांनी सज्जड गम भरला पाहिजे तरच हे शक्य होईल. कोणत्याही परिस्थितीत पश्चालरा अग्रस्थानी मानूनन कार्यकत्यांनी काम केले तरण हे शक्य होईल. अन्यथा हे शक्य होणार नाही.
- गटापेक्षा पक्ष मोठा हे जाहिरपणे पक्षघोष्ठींनी सांगितले पाहिजे
जिल्हयातील कंडीसवे नेते माजी मंत्री आ.चित्वजीत कदम, खा. विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आता जाहिरपणे पक्ष मोठा आहे त्यानंतर नेतृत्व असे सांगण्याची गरज आहे. गटबाजी करणान्यांना आता यापुढील काळात कोणताही बारा देणार नाही असे सांगितले तरचे या गटबाजीला थोडा तरी ब्रेक बसेल. अन्यथा कांग्रेसवे ये रे माझ्या मागल्या हीच अवस्था होईल. या सर्व नेत्यांनी सांगली महापालिका क्षेत्रात दुभंगलेल्या कंग्रेसच्या कार्यकत्यांशी बन दूबन संपर्क साचता आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांना ताकत चिली तर काँग्रेस निश्वितपणे पुन्हा उभारी पेबू शकते. सारे काही सुरळीत होवू शकते. पण हे करण्यासाठी नेत्यानी वेळ विला पाहिजे. आत्तापासूनच त्यासाठी कामाला लागले पाहिजे.
- कोणतीही निवडणुक पक्षाच्या चिन्हावरच
सांगली जिल्हा हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. याठिकाणी विरोधकांना उमे राहण्याची साथी संधी नव्हती. सामान्य कार्यकर्त्यांनाही काँग्रेस आपलीच वाटत होती आणि त्या सामान्य कार्यकत्यांलाही न्याय देण्याची भूमिका काँग्रेसच्या नेत्यांची होती. पण आता काळ बदलला. येळ यदलली आणि या बालेकिाचाच एक-एक बुरुज ढासळू लागले आहेत. है बुरूज अराकल्यानंतर आता त्यातील दगड-माती आणि विटाही लोकांनी पळवून नेले आहेत. त्यामुळे याठिकाणी केंद्रराचा बालेकिल्ला होता हेच मुळी आगामी पिढीला समजणार नाही इतकी वाईट अबरवा काँग्रेसची झाली आहे. याला सर्वस्वी जयावदार है काँग्रेसचे नेते आहेत असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. (यांच्या गवतटाच्या राजकारणात आणि एकमेकांची जिरवण्याच्या नादात हे सर्वकाही घडले आहे, हेही तितकेच खरे आहे. हे मान्य करण्याची धमकही आता कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये नाही. पण सामान्य कार्यकों आपली झालेली चूक मान्य करत आहेत. हे त्यांचे सारे कौतुक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेराला चांगले दिवस आणायचे असतील तर कोणतीही निवडणुक एका आणि फक्का काँग्रेसच्या पक्षाच्या चिन्हावरच लावली पाहिजे तरच हे शक्य आहे.








