रोड शोसह शक्तिप्रदर्शन : भाजप-जनता दलाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
खानापूर : तालुक्याच्या पूर्वभागात माझ्या आमदारकीच्या काळात विविध विकास योजना राबविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. यात तलाव भरणी, जलसिंचन, रस्ते, वैद्यकीय सेवा यासह विविध विकासकामांना प्राधान्य दिले आहे. यामुळे पूर्वभागात गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. मला पुन्हा संधी दिल्यास मी पूर्वभागाचा निश्चित कायापालट करणार आहे. यासाठी पूर्वभागातील मतदारांनी काँग्रेसला मतदान करून भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन अंजली निंबाळकर यांनी बोगूर येथे झालेल्या कोपरा सभेत केले. तालुक्याच्या पूर्वभागात काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांसह भव्य शक्तिप्रदर्शन करत प्रचारात मुसंडी मारली आहे. काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी पूर्वभागातील गावांमध्ये पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेत कोपरा सभा घेऊन संपूर्ण पूर्वभाग काँग्रेसमय केला आहे. यावेळी पूर्वभागातील भाजप, जनता दलाच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यकर्त्यांतील उत्साह पाहून अंजली निंबाळकर यांनी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याचे जाहीर केले आहे.
तालुक्याच्या पूर्वभागातील इटगी, बेडरहट्टी, बोगूर, करविनकोप यासह इतर गावात काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचार केला. यावेळी पदयात्रा काढून अंजली निंबाळकर यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत मतदान करण्याचे आवाहन केले. आम्ही विकासासाठी काँग्रेसबरोबर राहणार आहोत. आम्हाला पूर्वभागाचा विकास महत्त्वाचा आहे. या भागातील रस्ते, सिंचन योजना, वैद्यकीय सेवा आमदार निंबाळकर यांनी बऱ्यापैकी विकसित केल्या आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. पुढील पाच वर्षांत निश्चितच काँग्रेसकडून आमच्या fिवकासकामांची पूर्तता होईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी पूर्वभागातील मतदारांनी काँग्रेसला भक्कम पाठिंबा जाहीर केला आहे. य् ाावेळी इराप्पा हंपन्नावर, गंगाप्पा पट्टनायक, अदृष्य दो•ण्णावर, मंजू करपन्नावर, यल्लाप्पा होन्नापूर, चिदानंद पुजारी, बसवराज औरादी, राजू कुरबर, बसवराज तुरमुरी, देमाण्णा मुतनाळ, अप्पाण्णा दोडमनी, बाबू पट्टेद, गंगाप्पा बदली, रमेश देवन्नावर, संतोष गुरन्नावर, सुरेश बाळगपण्णावर, बसवराज अवरादी, मंजू बळकन्नावर, आकाश सत्यापगोळ, राजू मदेकन्नावर, गिरीश शिवपन्नावर, सातर शिवपन्नावर आदी उपस्थित होते.









