सांगली: शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे केंद्र सरकारने अन्नधान्यावर लावलेल्या जीएसटी विरोधात सांगलीतील गणपती पेठ येथील झांसी चौक मध्ये तीव्र आंदोलन करून राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला आंदोलनाचे नेतृत्व सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले होते.
पृथ्वीराज म्हणाले… केंद्र सरकारने अन्नधान्यावर ५ % जीएसटी कर आकारल्याने सामान्यांचा कंबर्ड मोडला आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अन्नधान्य वरील जीएसटी कर लागू नये अन्यथा काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांसोबत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील त्यांच्यासह सांगली शहरातील नगरसेवक व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleराष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत पूर्वा गावडेची दमदार कामगिरी
Next Article नगरपालिकेच्या जागेतील पत्र्याचे शेड हटविले









