रत्नागिरी प्रतिनिधी
मा. खासदार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भाजपा सरकारने सुडबुध्दीने खासदारकी रद्द करून विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करून त्याचा निषेध रत्नागिरी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
संपूर्ण देशात कॉंग्रेसने राहूल गांधींच्या अपात्रते विरोधात आंदोलन उभे केले आहे. त्याचाच भाग म्हणूनरत्नागिरी जिल्ह्यात सिव्हील हस्पिटलसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळेस “तब लढे थे गोरोसे….अब लढेंगे चोरोसे, राहुल गांधी, संगर्ष करो…. हम तुम्हारे साथ है, काँग्रेस पक्षाचा विजय असो…!, मोदी सरकार हाय हाय…!, अश्या घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष अशोक जाधव, ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, कपिल नागवेकर, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. अश्विनी आगाशे, महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.









