सावंतवाडी : प्रतिनिधी
संभाजी भिडे यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट दिसून येत आहे. सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने गांधी चौकात राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला .
संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात . परंतु ,यावेळी महात्मा गांधी यांच्या वरील विधानावरून मंगळवारी सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने गांधी चौक येथे संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर,ॲड. दिलीप नार्वेकर, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी,रवींद्र म्हापसेकर, शहर अध्यक्ष ॲड.राघवेंद्र नार्वेकर, ॲड. संभाजी सावंत, संजय लाड, समीर वंजारी ,अमिदी मेस्त्री, स्मिता वागळे, माया चिटणीस, सपना वेंगुर्लेकर, अण्णा केसरकर, संदिप सावंत ,समिर भाट ,आनंद कुंभार संतोष मडगावकर मिलिंद गोम्स, बबन डिसोजा आदी उपस्थित होते .









