अदानी समुहातील (Adani Enterprises) अर्थिक अनियमितता आणि गैरकारभाराची चौकशीबरोबरच हिंडेनबर्ग ( Hindenbirg ) संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीमार्फत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या ( Supreme Court ) देखरेखीखाली चौकशी करावी. या मागणीसाठी कॉंग्रेसने (Congress) देशभारत निदर्शने केली आहेत. तसेच देशातील गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीला शासनाने संरक्षण देउन अदानी- हिंडनबर्ग प्रकरणाची संसदेत चर्चा व्हावी अशा मागण्या काँग्रेसने आंदोलनातून केल्या आहेत. शासकीय नियंत्रणाखालील कंपन्या एलआयसी तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर सरकारी वित्तीय संस्थांनी अदानी कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकी चौकशी व्हावी असेही म्हटले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी 6 फेब्रुवारी रोजी देशभरातील एलआयसी आणि एसबीआय कार्यालयांसमोर देशव्यापी निदर्शने करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज देशभरात एसबीआय आणि एलआयसीच्या कार्यालया बाहेर निदर्शने करण्यात आली.
दरम्यान, काँग्रेस खासदारांनी संसद भवनातील गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली. विरोधी पक्षनेत्यांच्या गदारोळात दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले. सरकार या विषयावर संसदेत चर्चा होऊ देत नसल्याचे विरोधी पक्षाच्या खासदारांनी आरोप केला. काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पक्ष संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्यास तयार आहे, परंतु अदानी- हिंडनबर्ग मुद्द्यावर बोलत नाही.
पुण्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आले. हे आंदोलनं नसून जनसामान्यांचा आक्रोश असल्याचं सांगताना ते म्हणाले “नागरिकांच्या भविष्याबाबतीत सरकार नेमकी काय आणि कधी भूमिका घेणार हे माहिती नाही. काँग्रेस पक्ष सामान्य माणसांसोबत असून सर्वांनी एकत्र येऊन आंदोलनं करूया. केंद्रच्या विरोधात देशभर आंदोलनं होत आहेत. नागरिकांचे पैसे एलआसीमध्ये गुंतेलेले आहेत. केंद्र सरकारने यावर तातडीने निर्णय घेऊन सरकारने कारवाई करावी.” असे ते म्हणाले.
एसबीआय आणि एलआसीमधील सामान्य लोकांचा पैसा अदानी यांच्या शेअरमध्ये गुंतवले. परंतु, अदानी यांचे शेअर कोसळले आणि सामान्य लोकांचे पैसे बुडाले, ही चिंतेची बाब आहे. सध्या अदाणींच्या सगळ्या कंपनी तोट्यात सुरू आहेत. रिपोर्टवर आणि अहवालावर सरकारने आधीच लक्ष द्यायला हवं होतं. तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजे हीच आमची केंद्र सरकारकडे मागणी आहे, असे मत अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हटले.