Karnataka Election Result : कर्नाटकात आतापर्यंत काँग्रेस सध्या 125 जागी आघाडीवर आहे. काँग्रेस बहुमताचा आकडा गाठणार असा विश्वास सिध्दरामय्या यांनी व्यक्त केलायं. आम्हाला कुणाच्याही पाठिब्यांची गरज नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र जरी काँग्रेस आघाडीवर असली तरी बहुमत न मिळाल्यास आमदारांना अज्ञातस्थळी हलवण्याची तयारी सुरु केली असून, हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक केलं आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी काँग्रेस घेत आहे. त्यातच जरी भाजप आघाडीवर नसलं तरी ते जेडीएसला सोबत घेण्याच्या तयारीत असणार हे काँग्रेसला माहिती असल्यानं काँग्रेसनेही एकही आमदार फुटू नये याची काळजी घेत आहे. कालच भाजप नेत्यांची कुमारस्वामींशी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने खबरदारी घेत 15 हेलिकॉप्टर सज्ज केले आहेत. 6 जागांचा निकाल हाती आला असून 5 जागांवर काँग्रेस, तर 1 जागी जेडीएस आहे. काँग्रेसचा आकडा वाढला असून सध्या काँग्रेस 125 जागी आघाडीवर आहे, भाजप 76 जागेवर, जेडीएस 24 जागा अशी आकडेवारी आहे. बेळगावमध्येही काँग्रेसने आघाडी घेतली आहे. चिक्कोडी-सदलगामध्ये काँग्रेस गणेश हुक्केरी आघाडीवर असून, भाजपचे रमेश कत्ती पिछाडीवर आहेत. कर्नाटकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला आहे.
जरी काँग्रेस आघाडीवर असली तरी उरलेल्या जागांचा निकाल कुठल्याही बाजूने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडून आलेल्या उमेदवारांनी काँग्रस एकत्र ठेवणारचं. यासाठी मल्लिकार्जुन खर्गे स्वत: प्रत्येक घडामोडीची अपडेट ठेवत आहेत. बेळगाव, हुबळी, कलगुर्की याठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. काँग्रेस जेडीएस सोबत राहून सरकार स्थापन करतयं का हे पाहावं लागणार आहे.त्याच बरोबर डी. के. शिवकुमार आणि खरगे यांनी रणनिती आखली त्याचा फायदा काँग्रेसला होत आहे.अनेक आमदारांच्या संपर्कात शिवकुमार आहेत. मात्र 2024 निवडणूकीच्या आधी काँग्रेसला मिळालेलं यश निश्चित महत्त्वाचं आहे. जिथे-जिथे विजय निश्चित होतो तेथे काँग्रेस आमदारांना एकत्र करण्यास सुरुवात केलीय. जरी उमेदवार आघाडीवर असले तरी बहुमतासाठी आकडेवरी लागणार आहे.
Previous Articleमुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला!
Next Article पर्ससीन ट्रॉलरची फायबर नौकेला धडक !








