काँग्रेसच्या प्रजाध्वनी बसयात्रेला आज बेळगाव टिळकवाडी वीरसौध येथून सुरुवात झाली.
केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मुख्य उपस्थितीत ही यात्रा सुरु झाली आहे.
इ.स.1924 मध्ये बेळगावातील टिळकवाडी, काँग्रेस विहीर परिसरात काँग्रेसच्या महात्मा गांधी यांच्या उपस्थिती महाअधिवेशन भरले होते. त्या ठिकाणाहून ही यात्रा सुरु झाली आहे. तसेच केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यासह अन्य नेत्यांनी रस्त्यावर जमलेला कचरा झाडू मारून स्वच्छ केला.
या वेळी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणजितसिंह सुरजेवाला, एमएलसी बीके हरिप्रसाद, केपीसीसी राज्य उपाध्यक्ष बसवराज रायरेड्डी व इतर नेतेमंडळीसह बेळगावातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.









