बेळगाव/प्रतिनिधी:काँग्रेस पक्षाचे धोरण जे अवलंबितात त्यांना आपल्या पक्षाच्या कार्यालयाचे दरवाजे खुले असल्याचे कर्नाटकाचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी सांगितले.
ते आज बेळगाव सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येक जिल्हयात जाऊन पोलीस विभागाचा प्रगती आढावा बैठक घेण्यात येत आहे.
अन्य पक्षाचे नेते काँग्रेसकडे आकर्षित होत असल्यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले, आमच्या पक्षाचे तत्वे आणि सिद्धांत ज्यांना मान्य आहे आशांना आपल्या पक्षात स्वागत आहे. काँग्रेस कोणत्याही प्रकारचे ऑपरेशननीती अवलंबलेले नाही. अन्य पक्षाचे नेते आपल्या पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात. काँग्रेसची सत्ता मजबूत असून निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या गॅरंटी योजना आपण टप्याटप्याने पूर्ण करीत आहोत.
उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत दिव्यांगांवर हल्ला केलेल्या पोलिसांवर कारवाई न करता फक्त त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. आशा प्रकारच्या घटनांसंबंधी सरकार गंभीर आहे. पोलीस विभाग जनस्नेही आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेण्यात येत आहे तसेच
बेळगाव हिंडलगा कारागृहात सुरु असलेल्या गैरकारभाराच्या विरोधात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.









