भाजपच पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा येडियुराप्पांचा दावा : धर्मनाथ भवन येथे जाहीर सभा
प्रतिनिधी / बेळगाव
काँग्रेस पक्ष हे बुडणारे जहाज आहे. काँग्रेसला कोणतेही भविष्य नाही, त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला मोठ्या मताधिक्मयाने निवडून आणायची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे मत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी व्यक्त केले. धर्मनाथ भवन येथे गुऊवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, कर्नाटकात भाजपला पुन्हा निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा कर्नाटकाचा दौरा करत आहेत. त्यामुळे कर्नाटकात भाजपला बहुमत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी कार्यकत्यांशी चर्चा करून माहिती घेतली. या वेळी मंत्री गोविंद कारजोळ, आमदार बसनगौडा यत्नाळ, खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, भाजप प्रवक्ते एम. बी. जिरली, उपमहापौर रेश्मा पाटील मुऊगेंद्रगौडा पाटील, दादागौडा बिरादार उपस्थित होते.
बसव कॉलनीत प्रचारफेरी
गुऊवारी सकाळी बसव कॉलनात घरोघरी नागरिकांची भेट घेतली. भाजपला भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर येथील भागात प्रचारफेरी काढली. यावेळी या भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महिला मंडळाची भेट
डॉ. रवी पाटील यांच्या पत्नी सुनिता पाटील यांनीदेखील प्रचारात आघाडी घेतली आहे. घरोघरी महिलांच्या गाठीभेटी घेतल्या. बेळगावचा विकास कशाप्रकारे अधिक उत्तमरित्या करता येईल याबद्दल नागरिकांना पटवून दिले. भाजपला मतदान करून रवी पाटील यांना निवडून देण्याची विनंती केली.
श्री महालक्ष्मी महिला मंडळ मल्लिकार्जुननगर येथील महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन महिलांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत, याबाबत माहिती घेतली.
मुत्यानट्टी भागात प्रचारदौरा
डॉ. रवी पाटील यांनी मुत्यानट्टी भागातील मतदारांची भेट घेतली. या भागात उत्तम सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. संध्याकाळी कोनवाळ गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खडेबाजार, बापट गल्ली, कडोलकर गल्ली, बुऊड गल्ली गणपत गल्ली, माऊती गल्ली भागात प्रचारदौरा पार पडला. यावेळी नागरिकांनी जल्लोषात डॉ. रवी पाटील यांचे स्वागत केले आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी कण्याचा विश्वास व्यक्त केला.









