2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवाच्या भितीनेच काँग्रेसकडून कर्नाटकात ‘ऑपरेशन हॅस्त’ हाती घेतले असल्याची टिका भाजपचे नेते आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. तसेच 2024 च्या निवडणुकांच्या सर्वेक्षणात काँग्रेसला कमी जागा मिळतील याची पुष्टी झाली असून तसे घडल्यास त्याचा थेट परिणाम कर्नाटकातील राज्य सरकारवर होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
एका पत्रकार परिषदेतमध्ये बोलताना बोम्माई म्हणाले, “2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकार इतर पक्षांतील नेत्यांना खेचून अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी ऑपरेशन हस्त राबवत आहे. काँग्रेस आपल्या कटात कधीच यशस्वी होणार नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये येणाऱ्या अपयशाने घाबरले आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “भ्रष्टाचार आणि इतर बेकायदेशीर गोष्टींवर वार्तांकन करणार्या पत्रकारांना काँग्रेस सरकार नोटिसा बजावत आहे. हा सरकार त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करीत आहे.” आरोपही बोम्मई यांनी केला.”
कर्नाटक काँग्रेस पक्षाने राज्यातील विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांचे स्वागत करण्यास सुरुवात केली असून जेडीएसचे ज्येष्ठ नेते अयानूर मंजुनाथ आणि एस.पी. नागराजेगौडा यांनी बेंगळुरू येथील पक्षाच्या मुख्यालयात कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डी.के. यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.









