सांगरूळ येथे आयोजित ग्रामस्थांच्या बैठकीत निर्धार
सांगरूळ /वार्ताहर
काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवावी असा निर्धार सांगरूळ तालुका करवीर येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला .अध्यक्षस्थानी दत्त दूध संस्थेचे माजी चेअरमन नानासो कासोटे होते. २०२४ ची लोकसभा निवडणुक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी लढविण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी सांगरूळ येथील विविध सहकारी संस्थांचे आजी- माजी पदाधिकारी तरुण मंडळाचे कार्यकर्ते .शासकीय व निमशासकीय नोकरवर्ग व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक महादेव मंदिरामध्ये आयोजित करण्यात केली होती.
यावेळी बोलताना प्रा तुकाराम जंगम म्हणाले, बाजीराव खाडे यांच्या सारखा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवक गेली वीस पंचवीस वर्षे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय कार्यरत आहे. पण दुर्दैवाने आज कोणतीही निवडणूक म्हटले की त्या उमेदवाराचा राजकीय वारसा व आर्थिक पाठबळ याचा विचार समोर येतो .आणि यातून तेच तेच प्रस्थापित उमेदवार विविध पक्षांच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरतात . आणि पक्षाचे निष्ठावंत सर्वसामान्य कार्यकर्ते उमेदवारीपासून वंचित राहतात.
राजकीय वारसा नसणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवायचीच नाही का ? या प्रश्नाला समर्पक उत्तर देण्यासाठी लोकसभेची निवडणूक बाजीराव खाडे यांनी लढवावी त्याला संपूर्ण गाव पाठीशी राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .
भगवानराव लोंढे यांनी बाजीराव खाडे यांनी लोकसभेची निवडणूक रिंगणात उतरण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे. हे एक मोठे धाडस आहे तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात परिवर्तन करणार आहे. त्यांच्या या निर्णयाला संपूर्ण गाव पाठिंबा देईल असा विश्वास व्यक्त केला.
कोजिमाशि पतसंस्थेचे माजी चेअरमन कैलास सुतार यांनी स्व. मारुतराव खाडे यांनी लढवलेली विधानसभा निवडणुका असो किंवा आमदार जयंत आसगावकर यांनी लढवलेली विधान परिषदेची निवडणूक असो यावेळी संपूर्ण सांगरूळ गाव त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता. आज बाजीराव खाडे यांच्या रूपाने ज्याला सर्व सामान्य माणसाचे जगणे माहित आहे असा आमच्या मातीतील खासदार करूया आसे आवाहन केले. सांगरूळ ग्रामस्थांचे पाठबळ व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या कामाच्या व मतदार संघातील संपर्काच्या जोरावर पक्षाने जबाबदारी दिल्यास लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचा मानस बाजीराव खाडे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, सरपंच शितल खाडे, सांगरुळ शिक्षण संस्थेचे संचालक दत्तात्रय खाडे व आनंदराव कासोटे, कृष्णात चाबूक, तुकाराम नाळे, पांडुरंग सेवा संस्थेचे चेअरमन सतीश तोरस्कर माजी सरपंच गजानन परीट मनोहर सुतार यांचे सह गावातील प्रमुख सहकारी संस्था ग्रामपंचायत व तरुण मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









