कुंडलः वार्ताहर
मला मिळालेले मंत्रीपद हे पलूस-कडेगाव च्या मातीचा अन इथल्या सर्वसामान्य जनतेचा सन्मान होता असे भावनिक उद्गार माजी मंत्री आ.विश्वजित कदम यांनी व्यक्त केले. ते कुंडल, ता पलूस येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, पृथ्वीराज पाटील, पलूस बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले, मानसिंग बॅंकेचे संस्थापक जे.के.जाधव, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सदस्य उत्तमराव पवार आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश सदस्यदी उत्तमराव पवार यांची निवड झालेबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार कदम पुढे म्हणाले नैसर्गिक आपत्तीने शेतकरी हैराण झाला असतानाच केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून बळीराजा व सर्वसामान्य नागरीकांची चेष्टाच केली आहे.
आ. विक्रम सावंत म्हणाले, सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी मानून काँग्रेस पक्ष काम करत असताना अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या. सद्याच्या केंद्रातील वातावरणामुळे लोकशाहीला खीळ बसू लागली आहे. हिटलशाहीला दूर करण्याचे काम फक्त काँग्रेसच करु शकतो, असे वक्तव्य त्यांनी केले.
महेंद्र लाड म्हणाले ,गावातील सर्वसामान्य कुटुंबातील स्वातंत्रसैनिकांनी काँग्रेस टिकवून ठेवली अन् आता या गावात आज काँग्रेस भक्कमपणे उभी असून स्व. साहेबांच्या माध्यमातून मतदारसंघाचा चौफेर विकास झाला. साहेबांना सार्वांनी साथ दिली तशीच साथ विश्वाजित कदमांना देऊ या.