Sunil Kedar : कॉंग्रेसचे आमदार सुनिल केदार यांना 1 वर्षाची शिक्षा झाली आहे. 2017 साली महापारेषण कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला आहे. नागपूरच्या केळवद पोलीस स्टेशनात हा गुन्हा नोंद होता. सुनील केदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नागपुरातील तेलगाव गावात शेतातून वायर टाकण्याचं काम महापारेषणच सुरु होत. ज्यावेळी महापारेषणच काम सुरु होत त्यावेळी शेतात पिक होते त्यामुळे हे काम थांबवा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली होती. मात्र कर्मचाऱ्यांनी काम थांबवले नाही .यावेळी सुनिल केदार घटनास्थळी पोहचले होते. यावेळी त्यांनी महापारेषणच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली.त्यांच्या कामात हस्तक्षेप केला यासंदर्भात नागपूरच्या केळवद पोलीस स्टेशनात गुन्हा नोंद होता. मागील चार वर्षापासून हा खटला सुरु होता. आज हा निकाल जाहीर झाला यामध्ये सुनिल केदारसह आणखी चार जणांना एक वर्षाचा शिक्षा झाली आहे.
Previous ArticleBharat Jodo Yatra भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात २१ ‘समविचारी’ पक्षांना आमंत्रित
Next Article १० मिनिटांत बनवा तिळगुळाचे खमंग लाडू








