वृत्तसंस्था / अलवार
राजस्थानातील अलवार जिल्ह्यामधील रामगढ या विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार झुबेर खान यांचे निधन झाले आहे. ते या मतदारसंघातून सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. 62 वर्षांचे झुबेर खान काही काळापासून आजारी होते. शनिवारी पहाटे साडेपाच वाजता त्यांचे निधन झाले अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. शनिवारीच संध्याकाळी अंत्यसंस्कारही करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी, राजस्थान प्रदेश काँग्रेस अध्यक्ष रविंद्र दोतस्त्रा, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायटल इत्यादी नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.









