राजस्थानच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानमधील काँग्रेसचे वरिष्ठ आमदार पंडित भंवरलाल शर्मा यांचे रविवारी निधन झाले आहे. शर्मा हे चूरु जिल्हय़ातील सरदारशहर मतदारसंघाचे आमदार होते. शर्मा यांना शनिवारी जयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला आहे. 2018 मध्ये भंवरलाल हे 7 व्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. राजस्थानच्या राजकारणातील ते दिग्गज नेते होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आमदार शर्मा यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.









