पोलिसांनी नोंदविला गुन्हा
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशचे माजी मंत्री आणि गमधवानीचे काँग्रेस आमदार उमंग सिंघार यांच्यावर त्यांच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. आमदारावर बलात्कार, घरगुती हिंसेचा आरोप करत त्यांच्या पत्नीने गुन्हा नोंदविला आहे. जबलपूमध्ये झिरो एफआयआर नोंद झाल्यावर नौगाव पोलीस स्थानकात आमदाराच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. उमंग सिंघार हे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आहेत. उमंग सिंघारने विवाहापूर्वी विवाहाचे आमिष दाखवत बळजबरीने शारिरिक संबंध ठेवल्याचे त्यांच्या पत्नीने म्हटले आहे. आरोप करणाऱया महिलेचा 4 महिन्यांपूर्वीच आमदारासोबत विवाह झाला आहे. उमंग यांनी मानसिक छळ केल्याचेही महिलेचे म्हणणे आहे.
उमंग सिंघार यांच्याविरोधात मागील वर्षी स्वतःच्या प्रेयसीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झालह होता. मध्यप्रदेशातील सोनियाच्या कथित आत्महत्येप्रनकरणात त्यांचे नाव समोर आले होते. त्यावेळी प्रेयसी सोनिया भारद्वाजला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात नोंद झाला होता. आमदाराच्या भोपाळ येथील निवासस्थानात सोनियाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला होता.









