Karnataka Election Result : कर्नाटकात काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालं असून,136 जागांवर आघाडी घेतली आहे . दक्षिण भारतात सत्ता असलेलं एकमेव राज्य भाजपनं गमावलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सकाळ पासूनच कल काँग्रेसच्या बाजूने होता. 2018 च्या तुलनेत काँग्रेसला यंदा जादा जागा व्यापता आल्या आहेत. बेळगावात कार्यकर्त्यांनी गुलालची उधळण करत जल्लोष केलायं. आता काँग्रेस नेतृत्व मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलयं.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार पक्षनिहाय आघाडी
काँग्रेस –136 (विजय – 114, आघाडी – 22)
भाजपा – 64 (विजय – 50, आघाडी – 14)
जेडीएस – 20 (विजय – 17, आघाडी – 03)
इतर –04 (विजय)
बहुमत मिळवण्यासाठी जेडीएसला सोबत घ्यावं लागणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र काँग्रेस बहुमताचा आकडा गाठणार, आम्हाला कुणाच्याही पाठिब्यांची गरज लागणार नाही असा विश्वास सिध्दरामय्या यांनी व्यक्त केला होता. तर लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली होती. तर फोडाफोडी आणि खोक्याचं राजकारण लोकांना आवडल नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
दरम्यान, कर्नाटकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करत आणि हातात फलक घेत विजयाचा जल्लोष केला साजरा केला. काँग्रेसच्या वादळाचा भाजप- जेडीएसला मोठा फटका बसला आहे. 2018 च्या तुलनेत काँग्रेसच्या 56 जागा वाढल्या आहेत.तर भाजपच्या 40 जागा घटल्या आहेत. 2018 च्या तुलनेत जेडीएसच्या 17 जागा घटल्या आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









