वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस पक्षनेत्यांनी शुक्रवारी त्यांना श्रद्धांजली वाहिली. नवी दिल्लीतील शक्तीस्थळावर इंदिरा गांधींना पुष्पांजली वाहण्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्ल्कार्जुन खर्गे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी सफदरजंग रोड येथील त्यांच्या स्मारकालाही भेट दिली. इंदिरा गांधी निर्भय आणि दृढ होत्या. त्यांनी राष्ट्रसेवेसाठी आपले जीवन अर्पण केले, असे राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या दृढ इच्छाशक्ती, सक्षम नेतृत्व आणि दूरदृष्टीने भारताची एकता आणि अखंडता जपण्यात आणि एक मजबूत, प्रगतीशील भारत उभारण्यात महत्त्वपूर्ण योगदान लाभल्याचे वक्तव्य खर्गे यांनी केले.









