
पणजी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या फोंडा येथील सभेपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. शहा यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवायला जाणाऱ्या या नेत्यांवर कारवाई करण्यात आली. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, भाजपने कर्नाटकात विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी म्हादईचा केलेल्या ’कराराचा’ निषेध करण्यासाठी ते केवळ काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांच्यावर त्या आदीच कारवाई करण्यात आली. संपूर्ण सरकारी यंत्रणा आमच्या विरोधात वापरली गेली. आम्ही फोंड्यात पोहचण्या आदीच आम्हाला वाटेवर अडवून ताब्यात घेण्यात आले. आम्हाला अनेक ठिकाणी ताब्यात घेण्यात आले आणि महिला नेत्यांनाही कुळे येथील पोलिस ठाण्यात नेण्यात आले. असे करणे चुकीचे आहे,ठ असे पाटकर म्हणाले. त्यांना फक्त अमित शहा आणि भाजप नेत्यांकडून म्हादईच्या मुद्यावरून स्पष्टीकरण जाणून घ्यायचे होते, ज्यांनी कर्नाटकातील बेळगावी येथील रॅलीत सांगितले होते की ’ केंद्रातील भाजपने गोवा आणि कर्नाटक यांच्यातील म्हादईचा दीर्घकाळचा वाद सोडवला आहे आणि म्हादईला वळविण्याची परवानगी दिली आहे. याद्वारे कर्नाटकातील अनेक जिह्या?तील शेतकऱ्यांची तहान भागवली जाणार आहे. आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की त्यांनी आमची म्हादई कर्नाटकला विकली आहे का,ठ असे पाटकर म्हणाले. काँग्रेस नेते केवळ म्हादईच्या मुद्यावर भाजप नेत्यांकडून स्पष्टीकरण मागून निषेध करण्याचा प्रयत्न करत होते. गोवा सरकार आणि पोलिसांच्या कृतीने भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे. पोलिस सकाळपासून माझ्या मागावर होते. मी ओल्ड गोवा येथे माझ्या बहिणीच्या घरी गेल्यानंतर मला नजरकैदेत ठेवण्यात आले. मला बाहेर जाण्याची परवानगी दिली नाही. पोलिसांनी मला नजरकैदेत ठेवले,ठ असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
पक्षाचे अध्यक्ष अमित पाटकर, महिला अध्यक्षा बीना नाईक, प्रदीप नाईक आणि इतरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन राज्यातील विविध ठिकाणी नेले. ठभाजप आम्हाला घाबरत आहे हे आज स्पष्ट झाले आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत म्हादई नदीच्या प्रŽावर राज्य सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असे बोलण्याचे धाडस भाजप नेत्यांनी दाखवायला हवे होते, पण तसे काही झाले नाही, असे ते म्हणाले. माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आदींनी म्हादईप्रŽाr अमित शहा यांनी स्पष्टीकरण द्यावे, या मागणीसाठी फोंडा येथे निदर्शने केली. तसेच भाजपाच्या दबावतंत्राला न घाबरता कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. काँग्रेसने गोव्यात सत्ता असताना कधीही अशा हुकूमशाही पद्धतीचा वापर केला नाही आणि जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्नही केला नाही. ठभाजपच्या नेत्यांनी म्हादईबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी आमची मागणी आहे, त्यांनी म्हादईबाबत तडजोड केली आहे की ते गोव्यातील लोकांसोबत आहेत ते कळायला पाहिजे. पण कर्नाटकात त्यांच्या पक्षाला मते मिळवून देण्यासाठी त्यांनी आमच्या म्हादईशी तडजोड केली आहे,” असे पणजीकर म्हणाले. म्हादईबाबत ज्याने तडजोड केली, त्याचे गोव्यातील भाजप नेत्यांकडून स्वागत केले जात आहे. ठमी भाजपच्या या कृत्याचा निषेध करतो. अमित शहा यांनी कर्नाटक निवडणुकीसाठी डील केली आणि आमच्या म्हादईशी तडजोड केली. सर्व पॅबिनेट मंत्री त्यांचे स्वागत करत आहेत ही लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हादईच्या मुद्यावर त्यांनी अमित शहा यांना सवाल करायला हवा होता. पण ते अयशस्वी ठरले आहेत, असे गिरीश चोडणकर म्हणाले. काँग्रेस नेते विरेंद्र शिरोडकर, विजय भिके, जॉयल आंद्रादे, नौशाद चौधरी, राजेश वेरेंकार आणि इतर नेते निदर्शनावेळी उपस्थित होते. काँग्रेस नेत्या मनीषा उसगावकर यांनीही भाजप सरकारवर टीका करत लोकशाहीची हत्या केली गेली आहे असे म्हटले.अमित शहा यांना म्हादईच्या मुद्यावर निवडणूक जिंकायची आहे आणि त्यांनी आमच्या नदीची तडजोड केली आहे. आम्ही हे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत असताना भाजप आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे,ठ असे त्या म्हणाल्या.









