नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधातील “अत्यंत आक्षेपार्ह” विधानाबद्दल काँग्रेस नेते उदित राज यांना नोटीस जाणार आहे. यासंबंधीची माहीती राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) गुरुवारी दिली. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी उदित राज यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
“देशातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती आणि एक महिला असलेल्या राष्ट्रपतीं ज्या आपल्या पदापर्यंत खुप परिश्रमाने पोहोचल्या आहेत. त्य़ांच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उदित राज यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांच्या या टिप्पणीबद्दल राष्ट्रीय महिला आयोग उदित राज यांना नोटिस पाठवणार आहे” असे आयोगाच्या अध्यक्षा शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
काँग्रेसचे माजी खासदार असलेले उदित राज यांनी यापूर्वी राष्ट्रपती मुर्मू यांना “चमचागिरी” अशी टिप्पणी करून “कोणत्याही देशाला असा राष्ट्रपती मिळू नये” असे वक्तव्य केले होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









