कर्नाटच्या विजयानंतर राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते गेले चार- पाच दिवस कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीवर लक्ष केंद्रित करून होते. यावर आता फैसला झाला असून कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांची पक्षश्रैष्ठींनी निवड केली आहे. आज कॉंग्रेस पक्षाच्य़ा झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री होणार असून सर्वोच्च पदाचे आणखी एक दावेदार डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. तसेच डीके त्यांना राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाची खातीही मिळण्याची शक्यता आहे. सिद्धरामय्या यांचा शपथविधी उद्याच (गुरुवारी ) होण्याची शक्यता बोलली जात आहे.
माजी उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरासह काँग्रेसमधील इतरीही मुख्यमंत्री इच्छुकांनीही या पदासाठी स्वत:ची बाजू मांडली. पक्षाध्यक्ष खरगे यांनी मंगळवारी राहुल गांधी, काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक, नवनिर्वाचित आमदार आणि दोन प्रमुख दावेदार असलेले डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांना घेऊन अनेक बैठका घेतल्यानंतर सिद्धरमय्या यांची निवड झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे