Sachin Sawant On BJP : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) देशभरात छापे टाकत आहे. आतापर्यंत पीएफआयशी संबंधित १०६ लोकांनाही अटक करण्यात आली आहे. या कारवाई विरोधात शनिवारी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआयच्या सदस्यांनी आंदोलनं केली. या आंदोलनाच्या वेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पीएफआयचा फायदा भाजपलाच होतो आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी ट्विट करत केला आहे.
काय म्हणाले सचिन सावंत
पीएफआयवर भाजपा सरकारनं अजून बंदी का घातली नाही? भाजपाच्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी पुरावे आहेत हे जाहीर केलं होतं. भाजपाशासित पुणे महापालिकेनं पीएफआयला कोरोना काळात दफनविधीची जबाबदारी का दिली होती? पोलिस ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणाल्याची पुष्टी का करत नाहीत? भाजपालाच पीएफआयचा फायदा होतो असं ट्विट सावंतांनी केलंय.
Previous ArticleAnkita Bhandari Case: अंकिताच्या शवविच्छेदन अहवालानंतर अंत्यसंस्कार थांबवले; पुन्हा पोस्टमार्टम करण्याची मागणी
Next Article कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान








