समाज माध्यमांवरील तो पोस्ट म्हणजे बदनामीचे षड्यंत्र : मानहानीबद्दल पोलिसांत तक्रार
फोंडा : बेकायदेशीर जमिन बळाकवल्या प्रकरणात काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांचे नाव गुंतवून समाज माध्यमावऊन खोटा संदेश प्रसारीत कऊन नाहक बदनामी केली जात आहे. या प्रकरणी हाऊसिंगबोर्ड फोंडा येथील प्रितम हरमलकर याच्याविरोधात फोंडा पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती फोंडा गट काँग्रेसचे पदाधिकारी अऊण गुडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विलियम आगियार व शेर्ली डायस हे उपस्थित होते. बेकायदेशीर जमिन बळकावण्याच्या प्रकरणात सध्या जो तपास व खटले सुऊ आहेत, तो राजेश वेरेकर फोंड्यातील काँग्रेस नेता नसून वेगळाच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांची बेकायदेशीर जमिन बळकावल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात राजेश वेरेकर यांचा फोटोही टाकण्यात आलेला आहे. व्हॉट्सअॅप व फेसबुकवर हा पोस्ट टाकण्यात आला असून शेकडो लोकांपर्यंत तो पोचला आहे. ज्यामुळे राजेश वेरेकर यांना त्यांच्या हितचिंतकांकडून फोनही येऊ लागले आहेत.
राजेश वेरेकर हे फोंड्यातील नामवंत बांधकाम उद्योजक व समाज कार्यकर्ते आहेत. काँग्रेस नेते म्हणून गोव्याच्या राजकीय क्षेत्रात त्यांची ओळख आहे. समाजातील त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी मुद्दामहून बदनामीचे हे कटकारस्थान रचण्यात आले आहे. राजेश वेरेकर यांच्या काही राजकीय हितशत्रुंनी प्रितम हरमलकर यांना पुढे कऊन बदनामीचे हे षडयंत्र रचल्याचे आरोप अऊण गुडेकर यांनी केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राजेश वेरेकर यांनी फोंडा पोलिसांत हरमलकर याच्या विरोधात तक्रार नोंदविली असून आपली मानहानी व बदनामी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आल्याचे गुडेकर यांनी सांगितले.









