निर्मला सीतारामन यांच्या अमृतकाळ अर्थसंकल्पाला ‘मित्रांसाठी केलेला अर्थसंकल्प’ असून देशातील गरीब आणि बेरोजगार लोकांसाठी काहीही नसून केवळ काही श्रीमंतांनाच याचा फायदा होणार असल्य़ाचे मत कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडवर त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली.
निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प म्हणून संबोधले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याला दुजोरा देत अमृतकाळाचा उल्लेख करून निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आणि हा महत्वाकांक्षी अर्थसंकल्प भारताची स्वप्ने नक्कीच पूर्ण करेल असे म्हटले आहे. पंतप्रधानांच्या या शब्दावर कोटी करत राहुल गांधींनी हा अमृतकाळ नव्हे तर मित्रकाळातील अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. या अर्थसंकल्पात रोजगार निर्माण करण्याची कोणतीही तरतूद नाही तसेच भारताचे भविष्य घडवण्याचा कोणताही रोडमॅप नसल्याचा आरोप केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “भारतातील 1% सर्वात श्रीमंत लोकांकडे देशाची 40% संपत्ती आहे, देशातील 50% गरीब एकूण 64% GST भरतात तर देशातील 42% तरुण बेरोजगार आहेत…तरीही, पंतप्रधानांना काळजी नाही!” अशी पोस्ट करून राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








