कोल्हापूर :
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज शनिवार 16 रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे. शिवाजी पेठेतील गांधी मैदान येथे सभेची तयारी पूर्ण झाली आहे. दुपारी एक वाजता सभेस सुरुवात होणार आहे.
सभेला ऑलिंपिकवीर पैलवान बजरंग पुनिया उपस्थित राहणार आहेत. तसेच सभेस खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार विश्वजित कदम आदींसह काँग्रेस व मविआचे आजी-माजी आमदार, खासदार, सर्व उमेदवार उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठ मार्गे कावळा नाका, जिल्हाधिकारी कार्यालय, दसरा चौक, बिंदू चौक, आझाद चौक, टेंबे रोड, मिरजकर तिकटी मार्गे प्रियंका गांधी यांचे सभास्थळी आगमन होणार आहे.








