ऑनलाईन टीम/तरुण भारत
Nana Patole On Andheri Bypoll: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे (Andheri East Bypoll) चित्र आता स्पष्ट झालंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी (दि. १६) ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं काल म्हटलं होतं. भाजपकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आज सकाळपासून भाजपाच्या नेत्यांमध्ये बैठक झाली आणि अखेर या निवडणुकीतून भाजपाने माघार घेतली. तत्पूर्वी या सर्व घडामोडी सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एक वेगळीचं शंका निदर्शनास आणून दिली. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अंधेरी पोटनिवडणुकीच्या घोडमोडीशी भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा संबंध जोडला जात आहे. कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तशी शंका व्यक्त केली आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाष्य करताना नाना पटोले यांनी बिनविरोधच्या चर्चेवर शंका व्यक्त केली. एमसीएची निवडणूक सध्या सुरू आहे. पैशाच्या खजिन्याची निवडणूक सुरू आहे. एमसीए म्हणजे पैशाचा खजिना, याच पार्श्वभूमीवर देशातील आणि राज्यातील लोक चित्र पाहत आहेत. त्यातच दोन नेत्यांनी एकदम बिनविरोध निवडणूक व्हावी अशी भूमिका घेतली. त्यामुळे एमसीएच्या राजकारणाचा कुठेतरी वास येत असल्याचा संशय नाना पटोले यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा : सिसोदियांनी संजय राऊतांची केली काॅपी; ट्विटर ट्रेंड
नाना पटोले यांनी म्हटलं की,”मला थेट आरोप नाही लावायचा, मात्र एमसीएमध्ये जे सुरू आहे त्यावर मी बोलत आहे. राज्यात आतापर्यंत तीन पोटनिवडणुका झाल्या, पण एकही बिनविरोध झाली नाही. एमसीएच्या निवडणुकीनंतरच असा चमत्कार घडतो का? एक व्यक्ती भाजपचा मुंबई शहरातल्या एका नेत्याच्या घरी जातो त्यानंतर असं काही होतं, यात नक्कीच एमसीए निवडणुकीचा वास आहे.” अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध कऱण्याची चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना नाना पटोलेंनी म्हटलं की, “एमसीए निवडणुकीत काय झालं हे पाहिलं. कोण-कोण एकत्र आलं? निवडणूक बिनविरोध झाल्यास आमचा काही विरोध नाही. जनता समजदार आहे.”
नाना पटोले यांनी म्हटलं की, “काँग्रेस लोकशाहीच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे. घराणेशाहीचे आरोप जे करतात तेच घराणेशाहीत अडकले आहेत. फक्त घराणेशाहीचे आरोप लावून चालणार नाही तर कृतीत नसणं हे चुकीचं आहे. लोकशाही पद्धत ज्यांना मान्य आहे त्यांनी काँग्रेसची लोकशाही अवलंबायला हवी.” काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे. त्यावर बोलताना पटोले म्हणाले की, दोन्हीही काँग्रेसचे मातब्बल नेते उमेदवार आहेत. दोघांचाही संसदीय प्रणालीचा अभ्यास पूर्ण आहे. काँग्रेस हा गांधी कुटुंबापुरताच नाही तर देशाचा पक्ष आहे. मिस कॉलवाली पार्टी नाहीय. गांधी कुटुंबाला देशापेक्षा मोठं कुणीही नाही.