काँग्रेस नेता कन्हैया कुमार यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या अलीकडील “स्वसंरक्षणासाठी चाकू धारदार करा” यावर विधानावर “सद्गुणी लोक कधीही हिंसेबद्दल बोलत नाहीत” पण या साध्वी द्वेषपूर्ण विधान करतात या कोणत्या प्रकारच्या साध्वी आहेत अशी टीका केली.
मुंबईत काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्याला संबोधित करताना कन्हैय्या कुमार म्हणाले, “जे लोक खरोखर सद्गुगुणी आहेत ते कधीही हिंसेबद्दल बोलत नाहीत. ते कधीही द्वेषपूर्ण भाषा वापरत नाहीत. ते लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी नव्हे तर त्यांना एकत्र करण्यासाठी बोलतात. पण साध्वी प्रज्ञा या पूर्णपणे उलट वागत आहेत. ती लोकांना ‘धारदार सुऱ्या’ घरी ठेवण्यास सांगत आहे. ह्या कोणत्या प्रकारची साध्वी आहे, मला समजत नाही.” असे बोलून त्यांनी उपरोधक टोला हाणला. पुढे बोलताना कन्हैया कुमार म्हणाले की, साध्वी ठाकूर ह्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आवाहन देत आहेत. त्यांच्या विधानाने देशातील कायदा व्यवस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे कौतुक करून राहुल गांधी देशाचा पाया वाचवण्यासाठी बाहेर पडले आहेत असे म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








