रोहतक
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हुड्डा यांच्याविरोधात मानेसर जमीन घोटाळ्याप्रकरणी खटला चालविला जाणार आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने हुड्डा यांची याचिका फेटाळत हा आदेश दिला आहे. आता पंचकूला येथील सीबीआय विशेष न्यायालयात हुड्डा विरोधात आरोप निश्चित केले जाणार आहेत. मानेसर जमीन घोटाळ्याप्रकरणी हुड्डा विरोधात सीबीआयने यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे.









