पाकने हल्ला घडवून आणल्यचे कुणालाच मान्य नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरच्या पहलगा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी वाद निर्माण केला आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, याचा कुठलाच पुरावा नाही. भारताने ज्या 33 देशांमध्ये स्वत:चे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठविले होते, त्या देशांनीही या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार मानले नसल्याचा दावा अय्यर यांनी केला आहे.
अय्यर यांनी यावेण ऑपरेशन सिंदूरवर केंद्र सरकारला साथ देणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यावरही निशाणा साधला. थरूर आणि त्यांच्या टीमने ज्या 33 देशांचा दौरा केला, त्यातील कुठल्याही देशाने पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरविलेले नाही. तसेच संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेनेही पाकिस्तानला याकरता दोषी मानलेले नाही. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात होता हे आम्ही जगभरात सांगत फिरलो, परंतु आमच्या म्हणण्यावर कुणालाच विश्वास नसल्याचे उद्गार अय्यर यांनी काढले आहेत. पहलगाम हल्ला पाकिस्तानी यंत्रणेने घडवून आणल्याचा कुठलाच पुरावा आतापर्यंत सादर करता आलेला नाही असा दावाही त्यांनी केला आहे.
भाजपकडून संताप व्यक्त
मणिशंकर अय्यर यांच्या या दाव्यानंतर भाजपने संताप व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेख समिते या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाची शाखा टीआरएफचा हात असल्याचे नमूद केले असल्याचे काँग्रेस पक्षाला बहुधा माहित नसावे. दहशतवादाचा जन्म पाकिस्तानात झाला होता, हे देखील काँग्रेसला ठाऊक नसावे. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी अ•dयांना ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्याने नष्ट केले आडहे. काँग्रेस पाकिस्तानचा बचाव करत आमच्या सशस्त्र दलांचा अपमान करत असून हा प्रकार दुर्दैवी असल्याची टीका भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केली आहे.
काँग्रेस पक्ष आणि त्याचे नेते पाकिस्तानचे सर्वात मोठे समर्थक झाले आहेत. भारतविरोधी आणि पाकिस्तान समर्थक दुष्प्रचारात काँग्रेस नेते स्वत:चा लाभ पाहत असल्याचा आरोप भाजप नेते सी.आर. केसवन यांनी केला आहे.









