ऑनलाईन टीम / मुंबई :
काँग्रेसला पंतप्रधानपदात नव्हे, तर संविधान, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीच्या रक्षणात रस आहे, असं विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बेंगळूर येथील विरोधकांच्या बैठकीत केलं.
खर्गे म्हणाले, काँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छूक नाही. आमची भावना ही स्वतःसाठी सत्ता मिळवणं अशी नाही. आमची भावना ही संविधानाचं संरक्षण करणं, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचं संरक्षण करणं ही आहे. या ठिकाणी बैठकीला उपस्थित असलेल्या विरोधी पक्षांमधील काही पक्षांशी आमचे मतभेद आहेत. मात्र हे मतभेद एवढे मोठे नाहीत की आपण सर्वसामान्यांसाठी एकत्र येऊ शकत नाही. हे तेच सर्वसामान्य आहेत. ज्यांना आज महागाईच्या झळा बसत आहेत. आज तरुणांसमोर बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. पडद्यामागे शांतपणे ज्या गरीब, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांचे हक्क चिरडले जात आहेत, त्यांच्यासाठी एकत्र आलं पाहिजे.
Congress is not interested in power or PM post…, says Kharge at opposition meeting
Read @ANI Story | https://t.co/87UDOlRx8m#Congress #MallikarjunKharge #OppositionMeetinginBengaluru pic.twitter.com/Q5CqYoECLP
— ANI Digital (@ani_digital) July 18, 2023
भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले, सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आणि पक्षाचे नेते जुन्या मित्रपक्षांशी जुळवून घेण्यासाठी या राज्यातून त्या राज्यात धावत आहेत. आम्ही 26 विरोधी पक्ष आहोत, 11 राज्यांमध्ये सरकार आहे. भाजपला स्वतःहून 303 जागा मिळाल्या नाहीत, त्यांनी मित्रपक्षांची मते वापरली आणि त्यांना बाजूला केले.









