काँग्रेस ( Congress ) पक्षाचे प्रवक्ते जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी कॉंग्रेस भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) दुसऱ्या आवृतीचा विचार करत असल्याचे म्हटले असून ही यांत्रा पुर्व- पश्चिम राज्यांमध्ये सुरु होउन गुजरातमध्ये समाप्त होणार असल्याचे सुतोवाच दिले आहेत.
उत्तर ते दक्षिण भारताच्या म्हणजेच कन्याकुमारी ते कश्मीर या मार्गावरील कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेनंतर देशाच्या पुर्व ते पश्चिम दिशेने भारत जोडो यात्रेचे आयोजन करण्याच्या तयारीत असल्याचा खुलासा पक्षाचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी केला आहे. पूर्व- पश्चिम भारत जोडो यात्रेला अरुणाचल प्रदेशच्या पासीघाटमधून सुरवात होऊन ती गुजरातच्या पोरबंदरपर्यंत नेली जाईल. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एक लक्षवेधी कार्यक्रम करण्याचा काँग्रेसचा या यात्रेतून प्रयत्न केला जाणार आहे.
सर्वात लांब पदयात्रेपैकी एक मानल्या जाणाऱ्या भारत जोडो यात्रेत, कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत काढण्यात आली होती. राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू केलेली ही यात्रा 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये संपली. यामध्ये 13 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातून मार्गक्रमण करत, 4,000 किमी पेक्षा जास्त अंतर कापले होते.
Previous Articleचिंचवड पोटनिवडणुकीसाठी 41.06 टक्के मतदान
Next Article मतदारांचा निरुत्साह; कसब्यात 45.25 टक्के मतदान









